शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:15 IST

अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चकमकीत ठार मारलेल्या दहशतवाद्यांचा खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद्य यांनी या दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ठार मारण्यात आलेले सर्व दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, या दहशतवाद्यांचा आयएसजेके या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आल्याने संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या माहितीमुळे इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे. 

 श्रीगुफारा येथील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा होणे, हे लष्करासाठी मोठे यश मानण्यात येत आहे. गेल्या वर्षी सात नोव्हेंबरमध्ये जम्मू काश्मीरमधील जकूरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले होते.  इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ही आयएसआसएचचीच एक उपशाखा असल्याचे मानले जाते. ही संघटना भारतातील तरुणांना इस्लामच्या नावावर भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांत गुंतवण्याचे काम करते. भारतात आयएसचे अस्तित्व नसल्याचे भारत सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आज समोर आलेल्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरISISइसिसTerrorismदहशतवाद