पाण्याची बोंबाबोंब जोड
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:21+5:302015-03-06T23:07:21+5:30
भास्करराव डिक्कर : प्रभागातील रस्ते चांगल्या पद्धतीने डांबरीकरण केले आहेत.फूटपाथ,स्ट्रिट लाईट,स्वच्छता या सुविधा चांगल्या आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष शंकरराव घुले, अरुण जगताप यांनी विकास कामे केली. आताही आमदार अरूण जगताप आणि प्रभागाचे नगरसेवक असलेले महापौर आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामांचा आराखडा केल्याने विकास कामात हा प्रभाग आघाडीवर आहे. पहिले महापौर फुलसौंदर व संग्राम जगताप दोनदा महापौर झाल्याने शहराला महापौर देणारा हा प्रभाग आहे. त्यामुळे शहराचे राजकारण येथूनच चालते.

पाण्याची बोंबाबोंब जोड
भ स्करराव डिक्कर : प्रभागातील रस्ते चांगल्या पद्धतीने डांबरीकरण केले आहेत.फूटपाथ,स्ट्रिट लाईट,स्वच्छता या सुविधा चांगल्या आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष शंकरराव घुले, अरुण जगताप यांनी विकास कामे केली. आताही आमदार अरूण जगताप आणि प्रभागाचे नगरसेवक असलेले महापौर आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामांचा आराखडा केल्याने विकास कामात हा प्रभाग आघाडीवर आहे. पहिले महापौर फुलसौंदर व संग्राम जगताप दोनदा महापौर झाल्याने शहराला महापौर देणारा हा प्रभाग आहे. त्यामुळे शहराचे राजकारण येथूनच चालते. .........अमित औसरकर : पिण्याच्या पाण्याची लाईन आली आहे. मात्र टाकीतील पाण्याची क्षमता कमी असल्याने पाणी येत नाही. टॅँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पथदिवे आहेत. रस्ते डांबरीकरण झाले पाहिजे. .....विजया औसरकर : परिसरात कचरा कुंडी नाही. पिण्याचे पाणी नियमितपणे आले पाहिजे. रस्ते डांबरीकरण झाले पाहिजे. स्वच्छता नियमित होते. घंटागाडीही नियमित येते. ............सुनीता औसरकर : पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या आहे. टॅँकरचे पाणी येते. तेही नियमितपणे येत नाही. रस्ते डांबरी नाहीत. पावसाळ्यात चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. कचराकुंडी नाही. .......हर्ष औसरकर : पाण्याची समस्या मुख्य आहे. रोजच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रस्ते डांबरीकरण झाले पाहिजे. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही. टॅँकरचे पाणी नियमितपणे येत नाही. ..........गोविंदमहाराज हांडे: यमुनानगरमधील घरे खाली आणि रस्ता वरती अशी स्थिती आहे. रस्त्यांचे काम करताना अभियंते काहीतरी चुकीच्या पध्दतीने काम करतात. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरून मालमत्तेचे नुकसान होते. फेज टू ची लाईन टाकताना रस्ते खोदले. खोदाईनंतर रस्त्यावर आलेली माती-दगड ठेकेदार बाजूला करत नाही. .............शीतल जगताप (नगरसेविका): प्रभागात विकास कामे करण्याचे नियोजन केले आहे. फेज टू योजनेंतर्गत शांतीनगर येथे पाण्याची टाकी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंतर्गत लाईन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. योजना पूर्ण झाली की प्रभागात सर्वांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळेल. प्रभागातून गेलेल्या नाल्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. प्रभागातील समस्या सोडविण्याचे प्रस्ताव तयार झाले असून टप्प्याटप्प्याने मंजुरीनंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल. दोन-तीन वर्षात प्रभाग विकासाचे मॉडेल म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही.