सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचा मोर्चा प्रतिकात्मक प्रेतयात्रा : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

नाशिक : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी व भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामा मागणीसाठी शुक्रवारी शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

Congress's Opposition Magnitude Against Government: Demands for resignation of ministers | सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचा मोर्चा प्रतिकात्मक प्रेतयात्रा : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचा मोर्चा प्रतिकात्मक प्रेतयात्रा : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

शिक : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी व भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामा मागणीसाठी शुक्रवारी शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने दिलेल्या आदेशान्वये हा मोर्चा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कॉँग्रेस भवनापासून काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्ते पक्षाचा ध्वज व केंद्र, राज्य सरकारच्या विरोधातील घोषणाबाजीचे फलक घेऊन सहभागी झाले होते. महात्मा गांधी रोडवरून मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगेमहाराज पुतळा, शिवाजीरोड मार्गे हा मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक चौकात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आला. या ठिकाणी बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना, नागरिकांना खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून जनतेची घोर निराशा झाली असून, महागाईने डोके वर काढले, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेले असताना सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात ललित मोदी यांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी मदत करणार्‍या वसुंधरा राजे व पासपोर्ट देणार्‍या सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे यांनीही राजीनामा द्यावा, कांद्यावर निर्यातबंदी आणावी आदि मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात आमदार निर्मला गावित, डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, उत्तमराव कांबळे, शाहू खैरे, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, पांडुरंग बोडके, डॉ. तुषार शेवाळे, राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे, विमल पाटील, योगीता अहेर, सुरेश मारू, उद्धव पवार, आर. आर. पाटील, राजेंद्र बागुल, लक्ष्मण मंडाले, संजय पाटील, सुनील आव्हाड, वंदना मनचंदा, डॉ. ममता पाटील, रईस शेख, स्वप्नील पाटील आदि उपस्थित होते.
चौकट===
प्रेतयात्रेचा प्रयत्न फसला
या मोर्चात सेवादलाच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व मोर्चातच तिरडी घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. कॉँग्रेस भवनापासून काही अंतरावर गेल्यावर पोलिसांच्या निदर्शनास सदरचा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी झटापट करून साहित्य ताब्यात घेतले.

Web Title: Congress's Opposition Magnitude Against Government: Demands for resignation of ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.