शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

काँग्रेसची मुसंडी तर भाजपाला धक्का? ५ राज्यांच्या ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:18 IST

Assembly Election 2023: लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत एबीपी न्यूज-सी वोटरच्या सर्व्हेमधून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

निवडणुकीपूर्वी अखेरच्या टप्प्यातील ओपिनियन पोलमधील कलांनुसार तेलंगाणामध्ये चंद्रशेखर राव यांचा बीआरएस, मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस, तर राजस्थानमध्ये भाजपा बाजी मारेल, असा दावा करण्यात आला आहे. पाच पैकी दोन राज्यांत काँग्रेस, तर एका राज्यात भाजपाला आघाडी मिळताना दिसत आहे. तर उर्वरित दोन राज्यांत प्रादेशिक पक्ष बाजी मारतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार तेलंगाणामधील ११९ जागांपैकी ४९ ते ६१ जागा बीआरएसच्या खात्यात जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ४३ ते ५५ भाजपाल ५ ते ११ आणि इतरांच्या खात्यात ६ ते ८ जागा जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

तर विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये एमएनएफला १७ ते २१, झेडपीएमला १० ते १४, काँग्रेसला ६ ते १० आणि इतरांना ० ते २ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा बाजी मारताना दिसत आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४५ ते ५१, भाजपाला ३६ ते ४२ आणि इतरांना २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

या पाच राज्यांमधील सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये काँग्रेसला ११८ चे १३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला ९९ ते १११ जागांवर समाधान मानावे लागेल. इतरांच्या खात्यात ० ते २ जागा जाण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये मात्र काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपाला ११४ ते १२४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ६७ ते ७७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना ५ ते १३ जागा मिळू शकतात.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकmizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३