सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान

By Admin | Updated: January 3, 2015 02:33 IST2015-01-03T02:33:08+5:302015-01-03T02:33:08+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर शरसंधान करताना विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात केलेली कपात, भूमी विधेयकाला ठिसूळ बनविल्याबद्दल टीका केली आहे.

Congressional research by social media | सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान

सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर शरसंधान करताना विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात केलेली कपात, भूमी विधेयकाला ठिसूळ बनविल्याबद्दल टीका केली आहे. यासोबतच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची अनुदान राशी खात्यात जमा करण्याबाबत आणखी एक यू टर्न घेतल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर खात्याच्या माध्यमातून स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेट समितीच्या हॅसटॅगवरील विविध अहवालांच्या दुव्यांना जोडून विविध मंत्रालयांच्या निर्णयांवर शरसंधान केले आहे.
पक्षाने आपल्या टिष्ट्वटर खात्यावर विविध मंत्रालयांच्या निर्णयांवर टिप्पणी केली आहे. यात आरोग्य व कृषी अर्थसंकल्पानंतर हे सरकार आता पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी असलेल्या रकमेतही कपात करीत असल्याचे म्हटले आहे. अन्य एका नोंदीत, पक्षाच्या अहवालांचा आधार घेत, इस्रोच्या तात्पुरत्या अध्यक्षाच्या रूपात शैलेश नायक यांची नियुक्ती तर भूमी अधिग्रहणाच्या अलीकडच्या अध्यादेशावरुनही सरकारवर टीका केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पक्षाने प्रमुख मंत्रालयांच्या धोरणांवर व निर्णयांवर लक्ष ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात शॅडो कॅबिनेट समित्या स्थापन केल्या होत्या. आगामी अर्थ संकल्पादरम्यानही या हॅसटॅगवर हल्ले सुरू राहतील असे पक्षाने पुढे म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Congressional research by social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.