जि.प.मध्ये काँग्रेस झाली आक्रमक
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:56+5:302015-02-21T00:50:56+5:30

जि.प.मध्ये काँग्रेस झाली आक्रमक
>फोटो आहे...उपासराव भुते यांचे उपोषण: नारेबाजी करीत माठ फोडलेनागपूर : कुही तालुक्यातील मांढळ येथील नळ योजनेतील भ्रष्टाचाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी काँग्रेस सदस्यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात शिरून अध्यक्षांच्या कक्षापुढे नारेबाजी केली. गेटजवळ माठ फोडून प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. याच मागणीसाठी जि.प.सदस्य उपासराव भुते कार्यालय परिसरात उपोषणाला बसल्याने काँगे्रस आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळाले.आंदोलक कार्यालयात शिरल्याने पोलिसांचा गांंेधळ उडाला. मदतीला जादाची कुमक बोलावून सर्वाना ताब्यात घेतले. सदर पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. परंतु सुटका होताच आंदोलक पुन्हा जि.प.मध्ये धडकले. भुते यांच्यासह जि.प.तील विरोधी पक्षनेेते मनोहर कुंभारे, सदस्य मनोज तितरमारे, शिवकुमार यादव, नाना कंभाले, सरिता रंगारी, बबिता साठवणे, आदींनी आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. समितीला दोषी ठरविले मग योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा सवाल करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तसेच मांढळ येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली. पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे, माजी सभापती यशोधरा नागदेवे, नंदा तिजारे, सरपंच रोशन सोनकुसरे, नाना सूर्यवंशी, विनय गजभिये यांच्यासह मांढळ येथील शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनामुळे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने जि.प.ला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.(प्रतिनिधी)चौकट...प्रमुख मागण्यापाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणारे तत्कालीन प्रकल्प अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्या पोलिसात गुन्हे दाखल करा, मांढळ येथे नवीन योजनेला तात्काळ मंजुरी द्यावी. चौकट... सोमवारी बैठक पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली आहे. यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन जोंधळे यांनी केले. परंतु बैठकीचे पत्र न मिळाल्याने भुते यांच्यासह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.