शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:58 AM

सचोटी, समान संधी, युवकांसाठी रोजगार आणि २५ कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या कार्यक्रमाने काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : सचोटी, समान संधी, युवकांसाठी रोजगार आणि २५ कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या कार्यक्रमाने काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.काँग्रेसच्या कल्पनेतील भारत भाजपाहून फार वेगळा आहे व तो साकार करण्यासाठी देशातील युवावर्ग राहुल गांधी यांना नक्की साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.चिदंबरम यांनी व्टिट करत म्हटले आहे की, भारताबाबत आमचे विचार भाजपपेक्षा वेगळे आहेत. तरुणांनी आमच्या विचारांचे संरक्षण करावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. मला विश्वास आहे की, यावर तरुण निश्चित प्रतिक्रिया देतील.काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, काँग्रेस सर्वसमावेशक राजकारण करत आहे आणि सर्व भारतीयांचा आम्ही सन्मान करतो. यात सत्तारुढ पक्षाचाही समावेश आहे. काँग्रेसने देशाला २१ व्या शतकात आणले तर, मोदी देशाला मध्ययुगीन काळात घेऊन जातआहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.शत्रुघ्न सिन्हा यांनी केले राहुल गांधींचे अभिनंदन-पक्षाच्या अधिकृत भूमिकेहून वेगळा सूर लावत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाध्यक्ष झाल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन करत काँग्रेसला दीर्घायुष्य चिंतिले. राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी नैसर्गिक व सर्वात योग्य उमेदवार असल्याचे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. या शुभेच्छांबद्दल राहुल गांधी यांनीही शत्रुघ्नजींचे आभार मानले आहेत. तथापि, केंद्रीय राज्यमंत्री विजय गोयल यांनीही राहुल गांधी यांचे केले अभिनंदन केले आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस