शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:50 IST

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ‘मनरेगा’ योजनेद्वारे१४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले आहे. आता ही ‘न्याय’ योजना राबवून पाच कोटी गरीब कुटुंबांमधील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दारिद्र्य निर्मूलनाची लढाई निर्णायकपणे जिंकू, असा दावा त्यांनी केला.काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकार परिषदेत योजनेचा तपशील जाहीर केला.राहुल म्हणाले की, कोणालाही काम न करता घरी बसून पैसे देण्याची ही योजना नाही. आताही प् ा्रत्येक जण काम करतच आहे यापुढेही तो करत राहील. पण ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे ते कितीही प्रयत्न केले तरी गरिबीतच खितपत राहतात. सरकार त्यांना एका ठराविक उत्त्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आणून दारिद्र्याच्या नष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास मदत करेल. भविष्यात जेव्हा किमान १२ हजार रुपये मासिक उत्पन्न नसेलेले एकही कुटुंब देशात शिल्लक राहणार नाही, तेव्हा या योजनेची गरजच राहणार नाही व ती बंद होईल.ही योजना टप्प्याटप्याने राबविली जाईल. आधी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवून सुरुवात केली जाईल व नंतर ती देशभर राबविली जाईल, असेही सांगून ते म्हणाले की, काँग्रेसला गरीब नव्हे तर गरीबी नष्ट करायची आहे. ‘मनरेगा’ हा ‘गरीबी हटाव’चा पहिला टप्पा होता. आता ‘न्याय’हा दुसरा व निर्णायक टप्पा असेल.ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? यासाठी पैसा कुठून आणणार? या प्रश्नांना उत्तर देताना गांधी म्हणाले की, सखोल विचार करून आम्ही ही योजना तयार केली आहे. त्यासाठी जगातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांचा विचार व सल्ला घेण्यात आला आहे. देशाची सध्याची वित्तीय क्षमता पाहता या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे ही अशक्य कोटीतील बाब नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. योजनेचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. देशात चांगल्या कामांसाठी मुबलक पैसा आहेकोणत्याही देशात कधीही राबविली न गेलेली अशी ही योजना आहे. ती सादर करण्याचा आजचा दिवस काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, असेही राहुल म्हणाले. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व सत्तेवर येताच ती लागूही केली. त्याचप्रमाणे गरिबांना ‘न्याय’ देण्याचे हे वचनही काँग्रेस पूर्ण करेल, असे ते म्हणाले.भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी श्रीमंतांचा व गरिबांचा असे दोन भारत तयार करीत आहेत. शेतकऱ्यांना रोज तीन रुपये देण्याची थट्टा करूनही ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या खासगी विमानांमधून फिरणाऱ्या उद्योगपतींसाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण काँग्रेस हाच पैसा गरिबांसाठी वापरण्यास कटिबद्ध आहे.योजनेचा हा आहे तपशीलराहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब २० टक्के कुटुंबांना दरमहा किमान १२ हजार रुपये उत्पन्न असणे हे या योजनेचे मुख्य सूत्र असेल. उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न सहा हजार रुपये असेल तर त्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देऊन सरकार किमान १२ हजार रुपयांची पूर्तता करेल. लाभार्थी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजारांहून जेवढे कमी असेल, त्या फरकाची पूर्तता सरकार करेल. अशा प्रकारे या पाच कोटी कुटुंबाना सरकारकडून वर्षाला कमाल ७२ हजार रुपये दिले जातील. उत्पन्नपूर्तीची ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक