शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार; प्रियंका गांधी असणार केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:35 IST

प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : हिंदी भाषिक राज्यांत पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार उत्तर प्रदेशची प्रभारी असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत.प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल.उत्तर प्रदेशमध्ये दशकांपासून सत्तेपासून वंचित राहिलेला काँग्रेस पक्ष आता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी राज्याच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन मंडळात सामावून घेऊन राज्याची सूत्रे तरूण नेत्यांच्या हाती सोपवली आहे. दोन वेळा आमदार असलेले अजय कुमार लल्लू यांना गांधी यांनी राज बब्बर यांच्या जागी अध्यक्ष नियुक्त केले तर १२ सरचिटणीस, ४ उपाध्यक्ष, १८ सल्लागार समिती सदस्य आणि ८ कार्यकारी दल स्थापन केले आहेत.कार्यकारी दल क्षेत्रनिहाय प्रदेशांची वाटणी करून आपापल्या क्षेत्रासाठी रणनीती बनवण्याचे काम करतील व त्यांची देखरेख स्वत: प्रियंका गांधी करतील. प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशचे राजकारण दिल्लीत बसून करणार नाहीत तर आता त्यांनी लखनौमध्ये शीला कौल यांच्या निवासस्थानाला स्थायी निवासस्थान बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या आठवड्यातील चार दिवस लखनौत थांबतील.पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यात प्रियंका गांधी यांनी प्रदेशातील नेत्यांना बोलावून घेऊन सातपेक्षा जास्त बैठका घेतल्या व त्यानंतर हे पाऊल उचलले. बैठकीत प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत जे काही झाले ते झाले. २०२२ मध्ये काँग्रेसला कोणत्याही किमतीवर उत्तर प्रदेशची सत्ता मिळवायची आहे. आणि त्या दिशेने पंचायत स्तरापासून ते जिल्हा आणि जिल्ह्यापासून राज्यापर्यंत संघटन आधी उभे केले जावे व त्यासाठी प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची उपस्थिती सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस