शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस मताबरोबरच देणगीही मागणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 17:28 IST

नवी दिल्ली : स्वातंत्र्यकाळापासून बराच वेळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे. उद्योगपतींनी देणग्या देण्याकडे पाठ फिरविल्याने काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत मागण्याबरोबरच लोकांकडून देणगीही मागणार आहे. आता पक्षासाठी निधी जमविण्याची वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. काँग्रेसचे खजिनदार अहमद पटेल आणि पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या ...

नवी दिल्ली : स्वातंत्र्यकाळापासून बराच वेळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे. उद्योगपतींनी देणग्या देण्याकडे पाठ फिरविल्याने काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत मागण्याबरोबरच लोकांकडून देणगीही मागणार आहे. आता पक्षासाठी निधी जमविण्याची वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. 

काँग्रेसचे खजिनदार अहमद पटेल आणि पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. देशात लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास सर्वच राज्यांत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. तसेच उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्यांनी काँग्रेसला देणग्या देण्यास हात आखडते घेतले आहेत. यामुळे काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे. 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून देणग्या गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ही एक चांगली योजना आहे. यामुळे पक्षाशी सामान्य लोकांचा संबंध येईल. सर्वांना आता समजले आहे की, उद्योजक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. तर काँग्रेस आधीपासून सामान्य लोकांसोबत आहे. जनतेकडून देणग्या मागण्यात काही चुकीचे नाही, असेही दुसऱ्या नेत्याने सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसAhmed Patelअहमद पटेलElectionनिवडणूक