शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:41 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र...

कोलकाता - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र ही महाआघाडी आकारास येण्यापूर्वीच तिच्यात फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पश्चिम बंगालमध्येकाँग्रेस सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र काँग्रेसने ही शक्यता फेटाळून लावली असून, पुढील निवडणुकीत काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भाजपाविरोधात निवडणूक लढवेल, असे काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिर रंजन चौधरी म्हणाले की," आगामी निवडणुकीत काँग्रेस ना तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे, ना भाजपाबरोबर. पुढील निवडणुकीत आम्ही या दोन्ही पक्षांविरोधात पूर्ण क्षमतेने लढणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये प्रसारमाध्यमांमधील एका वर्गाकडून आमच्याविरोधात अफवा पसरवण्यात येत आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत." काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होईल, अशा आशयाचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चौधरी यांनी ही माहिती दिली.  ''काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपली लढाई सुरू ठेवेल. बंगालमध्ये आमची तृणमूल काँग्रेससोबत आघाडी झालेली नाही. तसेच काँग्रेस आगामी निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसविरोधात लढेल, अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे चौधरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल