शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Congress: राहुल गांधींच्या ‘स्टाफ’मध्ये आहेत तरी कोण? गुलाम नबी आझाद यांनी राजीनाम्यात केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 06:47 IST

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल केला होता

- आदेश रावल  नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल करीत म्हटले होते की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नव्हे, तर राहुल गांधी यांचा स्टाफ सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेतो. गुलाम नबी आझाद यांच्यापूर्वी चौधरी बीरेंद्र सिंह, हेमंता बिसवा सरमा, आरपीएन सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, जयवीर शेरगिल, राव इंद्रजित, एस. एम. कृष्णा, नारायण राणे, भुवनेश्वर कलिता, प्रेमा खांडू, सुष्मिता देव, सुनील जाखड, कपिल सिब्बल, हार्दिक पटेल आणि संजय सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी यांच्या स्टाफमध्ये कोण व्यक्ती काय निर्णय घेतात? पीए अलंकार सवई : महाराष्ट्रातील रहिवासी आहेत आणि पूर्वी बँकेत काम करत होते. काँग्रेसचे अनेक नेते अलंकार यांच्यावर आरोप करीत आलेले आहेत की, ते आपल्या पसंतीच्या नेत्यांनाच राहुल गांधी यांच्या जवळ जाऊ देतात. त्यांची आपल्या पसंतीच्या नेत्यांची एक यादी आहे. अलंकार हे राहुल गांधी यांच्यासोबतच असतात. मग ते दिल्लीत असोत वा बाहेर एखाद्या दौऱ्यावर. कनिष्क सिंह : यांना राहुल गांधी यांचे मित्रही म्हटले जाते. २०१४ पासून राहुल यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे कनिष्क हे आजकाल काँग्रेसमधील मतभेदांकडे लक्ष ठेवून असतात. तसेच, राहुल यांच्याशी संबंधित कायदेशीर प्रकरणेही ते पाहतात. ते माजी राजनैतिक अधिकारी एस. के. सिंह यांचे चिरंजीव आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण तेच पाहतात.कौशल विद्यार्थी : हे विदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत. राहुल गांधी यांची भेट कोणाशी होणार आणि दौरे याचा कार्यक्रम कौशल हेच निश्चित करतात. असे सांगितले जाते की, ते फक्त कामाशी काम ठेवतात. ई-मेल, ट्विटर हँडल्सवरून ते रिप्लाय देतात.बायजू : हे एसपीजीमध्ये अधिकारी होते. २०१० मध्ये त्यांनी नोकरी सोडली. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची रूपरेखा तयार करणे हे बायजू यांचे काम आहे. काँग्रेस सध्या ज्या भारत जोडो यात्रेची तयारी करत आहे, याची जबाबदारी बायजू यांच्याकडे आहे. ते केरळातील आहेत. राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण