शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पेगॅसस निकालाचे काँग्रेस, कायदेतज्ज्ञांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 05:31 IST

Pegasus : पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे.

नवी दिल्ली : पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेस तसेच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे. पेगॅससबाबत केंद्राने तत्परेतेने आपली योग्य भूमिका न्यायालयात मांडली नाही असा घरचा आहेर एनडीएमधील घटक पक्ष जनता दल (यू)ने भाजपला दिला आहे.

पेगॅससद्वारे करण्यात आलेले फोन टॅपिंग हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती पेगॅसस प्रकरणातील सत्य नक्कीच शोधून काढेल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, काही राज्यांचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपचे केंद्रीय मंत्री यांचेही फोन पेगॅससद्वारे टॅप करण्यात आले. त्यातून मिळणारी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचविली जात होती का? 

पेगॅससद्वारे केलेल्या फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगत पेगॅससच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय : भाजपकाँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार खोटे बोलतात. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नेमण्याचा आदेश दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले आहेत अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. पात्रा म्हणाले की, लोकांची दिशाभूल करणे, खोटे बोलणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जुनी सवय आहे. भाजपचा लोकशाही यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले.

केंद्राने योग्य भूमिका मांडली नाही : जेडीयूपेगॅसस प्रकरणात केंद्राने तत्परतेने योग्य रितीने भूमिका न्यायालयापुढे मांडली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने पेगॅससबाबत चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला अशी टीका भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) या पक्षाने केली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले, न्यायालयाने पेगॅसस प्रकरणी दिलेला आदेश ऐतिहासिक महत्वाचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकालसर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. खासगीपणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक निकाल आहे असे कायदेतज्ज्ञांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दुष्यंत दवे तसेच राकेश द्विवेदी, गीता लुथ्रा आदी ज्येष्ठ वकीलांनी पेगॅसस प्रकरणीच्या निकालाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस