शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:33 IST

एक यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदावारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात जोरदार घमासाण सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने सावध खेळी करत दिल्लीतील लोकसभेसाठीच्या सात जागांसाठी उमेदवारांच्या दोन याद्या तयार केल्या आहेत. यापैकी पहिली यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या घडामोडीवरून आम आदमी पक्ष आणि आणि दिल्ली काँग्रेस यांच्या युतीचे भवितव्य कठिण दिसत आहे. परंतु दोन्ही पक्षांमध्ये युतीची आशा कायम आहे.

उभय पक्षांच्या नेत्यामध्ये मतभेद असले तरी भाजपला रोखण्यासाठी दिल्लीत तीन-तीन-एक असा फॉर्म्युला अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. तीन जागांवर काँग्रेस आणि तीन जागांवर आम आदमी पक्ष तर उर्वरित एका जागेवर दोन्ही पक्षांच्या पसंतीचा उमेदावार देण्यात येईल, अशी शक्यता आहे. अद्याप काँग्रेस हायकमानकडून युती संदर्भात काहीही संकेत मिळाले नसल्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. लोकसभा लढविण्यासाठी काँग्रेसमधून 74 नावांची यादी प्राप्त झाली असून यामधून उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत. 

'आप'सोबत युती झाल्यास काँग्रेसला नवी दिल्ली, चांदनी चौक आणि उत्तर पश्चिम जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांवर नवी दिल्लीतून अजय माकन, चांदनी चौकमधून कपिल सिब्बल आणि उत्तर पश्चिम मतदार संघातून राजेश लिलोठिया किंवा राजकुमार चौहाण यांच्यापैकी एका नावावर मोहर लागेल, असे काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु, युती रद्द झाल्यास तीनही जागांवरचे उमेदवार बदलण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून दुसऱ्या यादीचा वापर करण्यात येईल. ज्यामध्ये नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक