बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जाणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:54 IST2017-08-26T01:53:43+5:302017-08-26T01:54:03+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे रवाना झाले. येथे ते राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांची भेट घेणार आहेत.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जाणार नाहीत
- एस. पी. सिन्हा।
पाटणा /नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे रवाना झाले. येथे ते राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांची भेट घेणार आहेत. तथापि, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात रविवारी आयोजित केलेल्या विरोधकांच्या रॅलीला आणि गुजरातमधील रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व बसपाच्या प्रमुख मायावती याही या रॅलीला उपस्थित राहणार नाहीत.
नॉर्वेच्या विदेश मंत्र्यांच्या निमंत्रणावरून राहुल गांधी ओस्लो येथे दौºयावर जात आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे या रॅलीला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव हे या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.