शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून सत्तेसाठी धर्माचा वापर; कर्नाटकात राजनाथसिंहांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 09:40 IST

कर्नाटकात राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका

बेळगाव : काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी धर्माचा वापर केला, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. बेळगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताच्या इतिहासात जर असा कोणताही राजकीय पक्ष असेल ज्याने सत्तेत येण्यासाठी धर्माचा आधार घेतला असेल तर तो काँग्रेस आहे. कर्नाटकात धार्मिक आधारावर चार टक्के आरक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. केवळ अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. 

ते म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुस्लीम किंवा ख्रिश्चन यांना आरक्षणाचा लाभ मिळाल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. परंतु, भारताचे संविधान धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी देत नाही. तुम्हाला जात, पंथ आणि धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करायचे आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

रेस्टॉरंटमध्ये प्रियांका गांधी यांनी बनविला डोसा काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी कर्नाटकातील त्यांच्या व्यस्त निवडणुकीच्या कार्यक्रमातून वेळ काढून येथील रेस्टॉरंटमध्ये डोसा कसा बनवितात हे शिकून घेतले. 

धर्मावर आधारित आरक्षण असंविधानिकउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी कर्नाटकमधील पहिल्या सभेत धर्मावर आधारित आरक्षणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आणि ते संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगितले. डबल इंजिन सरकारमुळे गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही, असा दावाही त्यांनी केला. 

भाजप घोडेबाजार करत सरकार स्थापण्यात तरबेजखरगे म्हणाले, राज्यात एकजुटीने काम केल्यास १५० जागा येऊन मजबूत असे काँग्रेस सरकार सत्तेवर येईल. भाजपने नेहमी कमी बहुमत मिळाले तर आमदारांना ईडी, सीबीआयचा धाक व पैशांचा घोडेबाजार करून खरेदी करून सरकार स्थापन केलीत. अशाच पद्धतीने महाराष्ट्र, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांत भाजपचे सरकार बनले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंह