शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत काँग्रेसची भिस्त खरगे-चौधरींंवर; गांधींचा हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 05:39 IST

सोनिया गांधी-राहुल गांधींचा हस्तक्षेप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची काँग्रेस सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात आणि विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यात सक्रिय भूमिका असणार नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत गुंतल्याने राहुल गांधी पक्षाच्या संसद कामकाज व्यवस्थापनात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे ही जबाबादारी काँग्रेसचे नवे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी सांभाळणार आहेत.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसची नवी रणनीती पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे नवे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे सभागृहाच्या कामकाजाबाबत विरोधी पक्षांशी धोरणात्मक संवाद साधण्याची जबाबदारी सांभाळतील. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या राहतील, परंतु त्या सभागृहात पक्षाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करणार नाहीत. काँग्रेस कशा पद्धतीने सामोरे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

शुक्ला यांची भूमिका महत्त्वाचीराज्यसभेत काँग्रेसचे नवे नेते म्हणून निवडून आलेले राजीव शुक्ला हे आगामी हिवाळी अधिवेशनात खरगे यांच्यासोबत पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शुक्ला यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध असल्याने त्यांची खर्गे यांना मोठी मदत होणार आहे. लोकसभेतील काँग्रेसची जबाबदारी अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, मनीष तिवारी आणि कोंडिकुनिल सुरेश यांच्यावर येऊ शकते.

जयराम रमेश, दिग्विजय सिंह  यांची अनुपस्थितीराहुल गांधींसोबतच काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद जयराम रमेश आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही हिवाळी अधिवेशनातील बहुतांश दिवस सभागृहात उपस्थित राहणार नाहीत. दोन्ही नेत्यांचा भारत जोडो यात्रेत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेसला संसद कामकाज व्यवस्थापन आणि इतर विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यासाठी इतर नेत्यांची गरज भासणार आहे.

हिवाळी अधिवेशन२९ डिसें.पर्यंत चालणारसंसदेचे हिवाळी अधिवेशन७ डिसेंबरपासूनसुरू होणार आहे,तर २९ डिसेंबररोजी संपणार आहे. या अधिवेशनात१७  बैठका होणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत. यादरम्यान महत्त्वाच्या तारखांचा तपशीलही जारी करण्यातआला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे