Congress Yatra : आज बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस 26 जानेवारी 2025 पासून 'संविधान बचाओ राष्ट्रीय पद यात्रा' काढणार आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'ने काँग्रेसला 'संजीवनी' दिली होती, हा काँग्रेसच्या राजकारणातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रा'ही काढली. आता आम्ही एक वर्षाची 'संविधान बचाओ राष्ट्रीय पदयात्रा' काढणार आहोत.'
'ही यात्रा प्रत्येक राज्यात होणार असून, त्यात सर्व मुद्द्यांचा समावेश केला जाणार आहे. महात्मा गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2025, या काळात एकही बैठक होणार नाही, हे पक्ष संघटनेचे वर्ष असेल. आमचे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ संमेलन सुरू झाले, ते पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. एप्रिलमध्ये गुजरातमध्ये एआयसीसीचा कार्यक्रम आयोजित करू,' अशी माहिती त्यांनी दिली.
या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस कार्यकारिणीत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच लवकरात लवकर सामाजिक-आर्थिक जात जनगणना करण्याची मागणीही करण्यात आली. CWC ने वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थसंकल्पात गरिबांना आर्थिक मदत आणि मध्यमवर्गीयांसाठी करात सवलत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. CWC ने बांग्लादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली.
भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र
संविधानाचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार : राहुल गांधीकाँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात की, बेळगाव येथे झालेल्या विस्तारित CWC च्या 'नवीन सत्याग्रह' बैठकीत आमचा नवा ठराव संविधानाच्या रक्षणासाठी समर्पित आहे. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेसने आपल्या सगळ्यांना मजबूत केले. दिल्लीत बसता ते ठीक आहे, पण मोठ्या शहरातून बाहेर पडून जिल्ह्यांपर्यंत जावं लागेल. विचारधारेसाठी लढणाऱ्यांना पक्षात जागा द्यावी लागेल. आरएसएसकडे अजिबात वाहून घेतलेले कार्यकर्ते नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा १० टक्के जास्त वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. पण, आपण त्यांना स्थान देत नाहीये, असे राहुल गांधी म्हणाले.