शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आतिशींविरोधात काँग्रेस फायरब्रँड महिला उमेदवार अलका लांबा यांना उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:03 IST

Delhi Assembly Elections 2025: एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला राज्यातील मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. दरम्यान, हे अपयश धुवून काढून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला राज्यातील मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. दरम्यान, हे अपयश धुवून काढून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, मंगळवारी पक्षाने आज झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिलीतील ३५ जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा केली. त्यापैकी २८ जागांवरील उमेदवारांची नावं बैठकीत निश्चित करण्यात आली. तर ७ जागांवरील उमेदवारांबाबतचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघात अलका लांबा यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्याशिवाय काँग्रेसने सीमापुरी येथून राजेश लिलोठिया, जंगपुरा येथून फरहाद सूरी, मटिया महल येथून आसिम अहमद आणि बिजवासन येथून देवेंद्र सहरावत यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली आहे.  आसिम अहमद खान आणि देवेंद्र सहरावत हे आम आदमी पक्षाचे माजी आमदार राहिलेले आहेत. दोन्ही नेत्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यात काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये काँग्रेसकडून कुठलीही कसर बाकी ठेवण्यात आलेली नाही. पक्ष बुथ पातळीवर काम करण्यावर भर देत आहे. सोमवारी २३ डिसेंबर रोजी पुढील विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, जाहीरनाम्यामधून केवळ तीच आश्वासनं दिली गेली पाहिजे जी पूर्ण करता येईल. काँग्रेस केवळ बाता मारण्यावर विश्वास ठेवत नाही.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसAAPआप