शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांत काँग्रेसची अन्य पक्षांशी आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:22 IST

विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आॅगस्टपासून प्रचार सुरू करणार आहेत.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आॅगस्टपासून प्रचार सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांच्यासह राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.या राज्यांतील परिस्थितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना राहुल यांनी तिन्ही प्रदेशाध्यक्षांना दिल्या आहेत. बैठकीत कमलनाथ, पी. एल. पुनिया आणि दीपक बाबरिया यांनी विस्तृत अहवाल राहुल गांधी यांना दिला. तिथे भाजपाशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेस कशा प्रकारे करू शकेल, याची माहितीही दिली.निवडणुकांत अन्य पक्षांशी समझोता करण्याबाबत राहुल गांधी यांनी या नेत्यांकडून माहिती मागितली आहे. मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी स्पष्ट केले की, बसपा व अन्य समविचारी पक्षांशी चर्चा सुुरू असून, लवकरच निर्णय होईल. त्या राज्यात बसपा व गोंडवाना पार्टीशी आघाडी करण्याची तयारी काँग्रेस करीत आहे.राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राज्यात काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. आघाडीबाबत काँग्रेस काय भूमिका घेईल ते स्पष्ट नाही. तेथील स्थितीविषयी १५ दिवसांनंतर या नेत्यांकडून अहवाल आल्यानंतर राहुल गांधी आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे.>बसपाशी चर्चा सुरू?मध्य प्रदेशात भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचा मुकाबला मजबुतीने मुकाबला करण्यासाठी तिथे काँग्रेस अन्य पक्षांशी आघाडी वा समझोता करून मैदानात उतरेल, हे जवळपास नक्की आहे. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हेही आघाडीसाठी अनुकूल आहेत आणि ते बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या संपर्कात आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस