शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस हा चोरांचा पक्ष; कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने दिला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 08:43 IST

काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी कठोर मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नसल्याची निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

बंगळुरू, दि. 22-  काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी कठोर मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नसल्याची निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली आहे. काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात कामाचा आदर केला जात नाही. मी आणि इतर नेत्यांनी पक्षासाठी जे काम केलं त्याची दखल घेतली जात नाही. प्रामाणिकपणा आणि चिकाटीला या पक्षात स्थान नाही, असं म्हणत कर्नाटकातील आमदार केएन रंजना यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम केला होता. नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर तसंच कर्नाटकातील या आमदाराने केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील नाराजी दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

नारायण राणेंनी दिला काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा 

नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत  बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. काँग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. २00५मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आपली त्यांच्याशी भेट घडविली. या भेटीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आलं होतं. 48 आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असतानाही आपल्याला डावलण्यात आलं. अशोक चव्हाण यांना आमदारांचा पाठिंबा नसताना मुख्यमंत्री करण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले महसूल खाते काढून उद्योग खाते दिले. विधान परिषदेत ज्येष्ठ असूनही माझी गटनेतेपदी निवड झाली नाही़ यापुढे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसºयापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसMLAआमदार