राहुल गांधींची फॅन झाली स्पॅनिश अभिनेत्री, शेअर केला इंस्टाग्रामवर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 12:46 PM2017-09-21T12:46:10+5:302017-09-21T18:08:34+5:30

अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या अमेरिका दौ-यात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त आहेत.

Rahul Gandhi's fan, a Spanish actress shared, photos on Instagram | राहुल गांधींची फॅन झाली स्पॅनिश अभिनेत्री, शेअर केला इंस्टाग्रामवर फोटो

राहुल गांधींची फॅन झाली स्पॅनिश अभिनेत्री, शेअर केला इंस्टाग्रामवर फोटो

Next

मुंबई, दि. 21 - अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या अमेरिका दौ-यात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त आहेत. राहुल गांधींच्या या दौ-यामुळे हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस चांगलीच प्रभावित झालीये. राहुलची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असं ती म्हणाली. 

नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर राहुल गांधींसोबत फोटो शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. जगातील विविध भागांतून आलेल्या महान विचारवंतांची भेट घेवून  आणि त्यांचे विचार ऐकून मी स्वतःला भाग्यवान समजते. चांगलं मन आणि चांगलं हृदय असेल तरच बदल घडवता येतो. माझ्या विचारांना योग्य दिशा दिल्याबद्दल मनापासून आभार असं तिने म्हटलं. नथालियाने 14 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 



कोण आहे नथालिया रामोस -
स्पॅनिश आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नथालिया रामोस हिला 2007 मध्ये आलेली फिल्म ब्रटज मधील यास्मीनच्या भूमिकेसाठी, 2013 मधील डामेड आणि 2011 मधील  निकेलोडन टेलीविजन सीरीज हाऊस ऑफ एन्यूबिसमधील नीना मर्टिन या भूमिकेसाठी ओळखलं जातं. तिची आई ऑस्ट्रेलियन आहे तर वडील कार्लोस रामोस हे एक स्पेनिश पॉप गायक आहेत. 


 

Web Title: Rahul Gandhi's fan, a Spanish actress shared, photos on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.