काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा
By Admin | Updated: February 22, 2015 23:48 IST2015-02-22T23:48:30+5:302015-02-22T23:48:30+5:30
जम्मू-काश्मीर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे़

काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा
जम्मू : जम्मू-काश्मीर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे़
पक्षाच्या एका प्रवक्त्याने रविवारी ही माहिती दिली़ जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सैफुद्दीन सोज यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना विधान परिषद निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन उमेदवारांना मतदान करण्याची विनंती केली आहे़ आमदारांनीही पक्ष निर्देश पाळण्याची हमी दिली आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले़ दोन्ही पक्षांत राज्यसभा निवडणुकीदरम्यान करार झाला होता़ (वृत्तसंस्था)