शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:43 IST

इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा 'आप'ला पाठिंबा जाहीर

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहे. या निवडणुकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग आहेत.

अरविंद केजरीवाल कसे देशविरोधी आहेत, हे पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे काँग्रेसचे अजय माकन यांनी सांगितले होते. मात्र, राहुल गांधींनी अजय माकन यांना फोन करून पत्रकार परिषद अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. राहुल गांधी यांनी सहकारी पक्षांचे म्हणणे ऐकले. मात्र, त्यानंतरही ‘इंडिया’च्या सहकाऱ्यांनी काँग्रेसऐवजी ‘आप’ला दिल्ली निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला, तर काँग्रेसचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीचे उद्दिष्ट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे होते, जे पूर्ण झाले आहे.

केंद्रासोबत काम करू : फारूख अब्दुल्ला

  • ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार केंद्राशी लढणार नाही, तर जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
  • ‘इंडिया’मधील एकतेच्या चिंतेबद्दल ते म्हणाले की, ही आघाडी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर ती भारताला मजबूत करण्यासाठी आणि द्वेष दूर करण्यासाठी आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा भाजपशी काहीही संबंध नाही. मात्र, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांना सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल