शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मुकाबल्यासाठी काँग्रेस आखणार रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:46 IST

भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा धर्माच्या नावावर धुव्रीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित असून भाजपच्या या रणनीतीचा कसा मुकाबला करायचा, याचा काँग्रेस गांभीर्याने विचार करीत आहे.माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठे नेते शकील अहमद यांनी भाजपच्या या रणनीतीवर टिप्पणी करताना म्हटले आहे की, काँग्रेससह देशापुढील हे मोठे आव्हान आहे. भारतात ब्रिटिश ज्या प्रकारे समाजात फूट पाडण्याचे उद्योग करीत होते, त्याचप्रमाणे भाजप फाटाफुटीचे राजकारण करीत आहे. धुव्रीकरण करणे सहज सोपे होईल, या विचाराने भाजपा हिंदूपुढे उभा करता येईल, असा मुस्लिम नेता भाजप शोधत आहे.भाजपच्या या रणनीतीबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसने तीव्र चिंता व्यक्त केली. या बैठकीला शशी थरूर, पी. चिदंबरम, आनंद शर्मा, पवन खेडा, प्रियंका चतुर्वेदी, राजीव गोडा, रणदीप सुरजेवाला, मीम अफजल, अभिषेक सिंघवी यांच्यासह ४० नेते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीचा मुख्य मुद्दा लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या मुकाबल्यात काँग्रेसची रणनीती कशी असावा, हा होता. काँग्रेस रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित मुद्दे उपस्थित करीत असते; परंतु भाजप धार्मिक मुद्दे उकरुन त्यावर पाणी फेरते, असे मत थरूर यांनी मांडले. २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. तथापि, आम्ही केवळ २५ टक्के क्षमतेने काम करीत आहोत; दुसरीकडे भाजप धुव्रीकरणाचे राजकारण करीत आहे, असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले. यावर पवन खेडा, संजय झा, राजीव त्यागीसह युवा प्रवक्त्यांनी आक्षेप घेतला. आम्ही सातत्याने भाजपच्या मुद्यांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी संघर्ष करीत आहोत. तेव्हा आम्ही युवा प्रवक्ते जे काही म्हणातात त्याचा काहीही परिणाम होत नाही, असे म्हणणे उचित ठरणार नाही, असे मत युवा प्रवक्त्यांनी मांडले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाLoksabhaलोकसभा