शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

VIDEO- भारतात एकूण किती राज्यं? पाहा स्मृती इराणींनी काय दिलं होतं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 9:59 AM

फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला.

नवी दिल्ली-  फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी नुकतीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एनसीसबद्दल माहिती नसण्यावरून टीका केली.  "राहुल गांधीजी हे काय चालले आहे. तुम्ही जे सांगत आहात त्याच्या उलट तुमची टीम काम करत आहे. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचंच अॅप डिलीट केलं आहे. आता आपण तंत्रज्ञानाचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आपला डेटा सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये का पाठवते. जिथून हा डेटा कोणताही टॉम, डिक किंवा अॅनॅलिटिका मिळवू शकते, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती. 

 

 

फेसबूक युजरच्या डेटाचा राजकीय हेतूंसाठी उपयोग केला जातो आहे असं म्हणताना त्यांनी एका परकीय कंपनीचं नाव घेतलं. याच उत्तर म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी स्मृती इराणींचा एका जुना व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे. ट्विटर यूजर  @Joydas ने हा व्हिडीओ आधी शेअर केला. तो व्हिडीओ संजय झा यांनी रिट्विट केला आहे. स्मृती इराणी यांनी काही वर्षांपूर्वी शेखर सुमनच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्मृती इराणी या कार्यक्रमात गेल्या होत्या. त्या कार्यक्रमात शेखर सुमन यांनी स्मृती इराणी यांना भाजपाची संबंधीत प्रश्न विचारले. भाजपाबद्दल तुमचं ज्ञान किती आहे? याची आम्हाला माहिती करून घ्यायची आहे, असं शेखर सुमन यांनी म्हंटलं. भारतात एकुण किती राज्यं आहेत? असा प्रश्न शेखर सुमन यांनी विचारला. त्या प्रश्नावर 'मला माहिती नाही', असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं. भाजपाची किती राज्यात सरकार आहे? असा प्रश्न शेखर सुमन यांनी विचारल्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, 'माझ्या माहितीनुसार एकुण तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. बाकी मला माहिती नाही'. त्यावर शेखर सुमन यांनी स्मृती इराणींची चूक सुधारत एकुण 7 राज्यात भाजपाची सरकार असल्याचं सांगितलं.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी