काँग्रेस प्रवक्त्याने केला अफझल गुरुचा आदरार्थी उल्लेख
By Admin | Updated: February 15, 2016 16:51 IST2016-02-15T16:51:11+5:302016-02-15T16:51:11+5:30
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत अफझला गुरुला आदर देत 'अफझल गुरु जी' असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर चांगलीच टीका होऊ लागलीये

काँग्रेस प्रवक्त्याने केला अफझल गुरुचा आदरार्थी उल्लेख
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अफझला गुरुला आदर देत 'अफझल गुरु जी' असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर चांगलीच टीका होऊ लागलीये.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांसंबधी पक्षाची भुमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली होती, यावेळी त्यांनी अफजल गुरुचा उल्लेख आदरार्थी केला. त्यांच्या या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर रणदीप सुरजेवाला यांनी 'पत्रकार परिदषेदत अनेक वेळा अफझल गुरुचा उल्लेख झाल्याने चुकून माझ्या तोंडून अफझल गुरुजी असा उल्लेख झाला' असल्याच स्पष्टीकरण दिलं.