काँग्रेसचा खर्च प्रशासनावर, तर भाजपाचा प्रसिद्धीवर
By Admin | Updated: October 6, 2014 04:18 IST2014-10-06T04:18:25+5:302014-10-06T04:18:25+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे यासह नऊ पक्षांनी सन २०१२-१३ या वर्षात सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले आहेत

काँग्रेसचा खर्च प्रशासनावर, तर भाजपाचा प्रसिद्धीवर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे यासह नऊ पक्षांनी सन २०१२-१३ या वर्षात सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचा प्रशासकीय कामकाज तसेच इतर बाबींवरील खर्च जास्त झाला आहे. तर, भाजपाचा जाहिरात आणि प्रसिद्धी तसेच प्रवासखर्च अधिक आहे. या पक्षांनी आयकर विभाग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ताळेबंदावरून असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्मस आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने अहवाल तयार केला आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.