शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

"सहा वर्षांपासूनचा 'अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड' आता 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' म्हणून लपवला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:40 IST

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल; विविध विषयांवरून जोरदार टीका

नवी दिल्ली: देशाची ढासळती अर्थव्यवस्था, त्यामुळे निर्माण झालेलं बेरोजगारीचं संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. देशात दररोज ३८ बेरोजगार आणि ११६ शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान मोदींना झोप तरी कशी लागू शकते?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि देशातील जनता या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देश आणीबाणीच्या स्थितीत चालला आहे. कोसळणारा जीडीपी सरकारच्या अपयशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन 'मास्टरस्ट्रोक' नव्हे, तर 'डिझास्टर स्ट्रोक' ठरले आहेत, अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तरकाही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाचा उल्लेख ऍक्ट ऑफ गॉड असा केला होता. त्यावरूनही सुरजेवालांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'गेल्या सहा वर्षांपासून 'अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड'च्या माध्यमातून अर्थव्यवस्था हाकणारे आता त्यांचं अपयश 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड'च्या नावावर खपवत आहेत. जीडीपीची घसरण सामान्यांच्या जीवावर उठली आहे. लोकांचा आणि बँकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे,' अशी टीका सुरजेवाला यांनी केली. कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र मोदी सरकार देशासमोरील समस्यांपासून पळ काढतंय, असं सुरजेवाला म्हणाले. '८० लाख लोकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून ३० हजार कोटी रुपये काढलते. अनेक लघु-मध्यम उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पंतप्रधान कोरोना, चीनची घुसखोरी, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून बचावाच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपलं म्हणणं मांडतच राहू, असंही सुरजेवाला पुढे म्हणाले.बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीfarmer suicideशेतकरी आत्महत्याEconomyअर्थव्यवस्था