शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:16 IST

Citizen Amendment Act : नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना

रांची - गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध मोठं आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची धग देशभरात जाणवत असून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेससहनागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यांना टोला लगावलाय. तसेच, काँग्रेसला आव्हानही दिलंय.

नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. आर्टीकल 370 वेळेसही काँग्रेसने असाच गोंधळ घातला होता. आर्टीकल 370 काढले तर करंट बसेल, वातावरण चिघळेल, असा संभ्रम निर्माण केला होता. मात्र, तुम्हीच पाहिलं, 370 हटविल्यानंतर आता काश्मीरमध्ये शांतता आहे. काँग्रेस केवळ आपलं राजकारण करण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अफवा पसरवत आहेत, हिंसाचार घडवत आहेत. या कायद्यामुळे हिंदु-मुस्लीम-शिख-ईसाई, देशातील एकाही नागरिकाच्या नागरिकत्वास धोका होणार नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच, मी काँग्रेस पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल, पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा काँग्रेसने करावी, असे मोदींनी म्हटले. 

जर काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आर्टीकल 370 लागू करा. तीन तलाकविरुद्ध जो कायदा बनलाय, तो रद्द करणार, असं काँग्रेसने जाहीरपणे सांगावं. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असे मोदींनी आपल्या झारखंडमधील भाषणात म्हटले. आम्ही जो कायदा बनवलाय तो,  बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तामधून धार्मिक अत्याचारासाठी आपल्या देशात येणाऱ्या लोकांसाठी हा कायदा बनवलाय, असे मोदींनी सांगितले. देशाला बरबाद करण्याचं काम का करताय? देशातील मुस्लिम नागरिकांना का भिती दाखवताय, असे म्हणत मोदींनी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांना लक्ष केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेस