जगात ४ प्रकारचे दु:खी; शॉटगन सिन्हांनी शोधला मोदींशी संबंधित चौथा भन्नाट व्हेरिएंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 01:07 PM2021-06-27T13:07:53+5:302021-06-27T13:08:38+5:30

शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजातील दुःखी लोकांचे चार प्रकार सांगत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

congress shatrughan sinha tweets the new variant is unhappy with pm modi | जगात ४ प्रकारचे दु:खी; शॉटगन सिन्हांनी शोधला मोदींशी संबंधित चौथा भन्नाट व्हेरिएंट

जगात ४ प्रकारचे दु:खी; शॉटगन सिन्हांनी शोधला मोदींशी संबंधित चौथा भन्नाट व्हेरिएंट

Next

नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदींवर विरोधकांकडून अनेकविध विषयांवरून टीका करण्यात येत आहे. कोरोनाची लाट, लसीकरण, जीएसटी, इंधनदरवाढ, महागाई यांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजातील दुःखी लोकांचे चार प्रकार सांगत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. (congress shatrughan sinha tweets the new variant is unhappy with pm modi)

“त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

शत्रुघ्न सिन्हा यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये समाजाच ४ प्रकारची दुःखी माणसं असतात, असे म्हटले आहे. पहिला प्रकार म्हणजे आपल्या दुःखामुळे दुःखी असलेले लोकं, दुसरे म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखामुळे दुःखी होणारे लोकं, तिसरे म्हणजे दुसऱ्यांचे सुख पाहून दुःखी होणार लोकं असतात आणि चौथा नवीन प्रकार म्हणजे काही कारण नसताना मोदींमुळे दुःखी होणारे लोकं, असे सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

पुन्हा भाजपवापसीची तयारी!

शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या ट्विटवर अनेक युझर्सनी भन्नाट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रवि मिश्रा नामक युझर्स म्हणतात की, असं वाटतंय की पुन्हा भाजपवासी होण्याची तयारी केली आहे. तर राकेश जयस्वाल यांनीही सिन्हा यांच्या ट्विटवर कमेंट केली असून, हे तर घरवापसीचे संकेत आहेत, असे म्हटले आहे. दरम्यान, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला रामराम केला होता. बिहार येथील पाटणा साहिब मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, याच ठिकाणाहून भाजप नेते तसेच केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सिन्हा यांचा पराभव केला. भाजपच्या तिकिटावर याच मतदारसंघातून सिन्हा दोनवेळा निवडून आले होते. 
 

Web Title: congress shatrughan sinha tweets the new variant is unhappy with pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.