शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

... तर Petrol ३० रूपये, हे Tweet डिलीट करून कुठे चाललात?; काँग्रेसचा Baba Ramdev यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 09:17 IST

Petrol-Diesel च्या वाढत्या दरावरून काँग्रेसनं साधला योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा. काँग्रेसनं केलं त्यांचं जुनं ट्वीट शेअर.

ठळक मुद्देPetrol-Diesel च्या वाढत्या दरावरून काँग्रेसनं साधला योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा.

पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel Price)च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच २१ ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडं मोडलं आहे. दरम्यान, यावरून जुनं ट्वीट शेअर करत कांग्रेसनं (Congress) योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा साधला आहे.

युथ काँह्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बुधवारी बाबा रामदेव यांचं ९ वर्ष जुन्या ट्वीटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला. देशात काळा पैसा (Black Money) परत आला तर पेट्रोल ३० रूपये प्रति लीटर दरानं मिळेलं असं बाबा रामदेव यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. ९ ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी हे ट्वीट केलं होतं. या स्क्रीनशॉटनुसार त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याचं म्हटलं आहे. "ट्वीट डिलीट करून तुम्ही कुठे चाललात," असा टोलाही त्यांनी याद्वारे लगावला आहे.  गुरूवारीही इंधन दरवाढ

  • दिल्ली - पेट्रोल १०६.५४ रुपये आणि डिझेल ९५.२७ रुपये प्रति लिटर
  • मुंबई - पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल १०३.२६ रुपये प्रति लिर
  • चेन्नई - पेट्रोल १०३.६१ रुपये आणि डिझेल ९९.५९ रुपये प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल १०७.११ रुपये आणि डिझेल ९८.३८ रुपये प्रति लिटर 

ऑक्टोबरमध्ये ५ रुपयांनी वाढआतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर १५ पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल ४.८० रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल ५ रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPetrolपेट्रोलcongressकाँग्रेस