सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. सध्या देशात ऑक्सिजन आणि औषधांचीही कमतरता जाणवत आहे. दरम्यान, यावरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरत असलेल्या सरकारविरोधात बंड केलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली. "आपल्याकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कोणतीही कमतरता नाही हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. उत्तर प्रदेशात लसींची कोणतीही कमतरता नाही हे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचाही मला धक्का बसला आहे," असं चिदंबरम म्हणाले.
Coronavirus In India : "लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरणाऱ्या सरकारविरोधात बंड करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 22:39 IST
पी. चिदंबरम यांची संतप्त प्रतिक्रिया. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं धक्का बसला, चिदंबरम यांचं वक्तव्य.
Coronavirus In India : लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरणाऱ्या सरकारविरोधात बंड करा
ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं धक्का बसला, चिदंबरम यांचं वक्तव्य.सर्व वृत्तं, दृश्ये खोटी आहेत का? चिदंबरम यांचा सवाल