दिल्लीत काँग्रेस इच्छुकांची गर्दी
By Admin | Updated: September 17, 2014 18:44 IST2014-09-17T01:43:43+5:302014-09-17T18:44:50+5:30
काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी काँग्रेसच्या मुख्यालयात गर्दी केली आहे.

दिल्लीत काँग्रेस इच्छुकांची गर्दी
नवी दिल्ली : काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी काँग्रेसच्या मुख्यालयात गर्दी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या कार्यालयात महाराष्ट्राच्या कानाकोप:यातून आलेल्यांनी भेटीसाठी चढाओढ चालविल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. उमेदवारांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वी विरोध आणि तक्रारींचा सिलसिलाही सुरू झाला आहे.
छाननी समितीने सोमवारी आणि मंगळवारी बैठकी घेत जवळपास सर्वच जागांसाठी यादी तयार केली आहे. त्यावर निवड समितीकडून मोहर लागायची आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी रात्री उशिरा मायदेशी परतणार असल्यामुळे काही मुद्यांवर लगेच तोडगा काढला जाईल, असे सूत्रंनी सांगितले.
राणो, पतंगरावांना हवे मुलासाठी तिकीट
पतंगराव कदम लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पुत्र विश्वजित कदम यांच्यासाठी तर नारायण राणो हेही मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी दिल्लीत डेरेदाखल झालेले आहेत. त्यांनी मंगळवारी मोहनप्रकाश यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. राहुल
गांधी आणि सोनिया गांधी
यांना भेटण्याचीही त्यांची तयारी
आहे. सांगलीतील जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेत्यांनी पतंगराव कदम यांच्यावरील रोष व्यक्त केला आहे.
पतंगराव हे एका गुन्हेगाराची बाजू घेत असल्याचा आरोप सांगली
महिला जिल्हाध्यक्षांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी 1क् जनपथ बाहेर धरणो देण्याची घोषणाही केली आहे. त्यांनी पतीसोबत काही पत्रकेही वाटली. 22काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नातलगांसाठी जोर लावला असला तरी निवडणूक जिंकण्याची
शक्यता पडताळली जाणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित यांना
तिकीट मिळणार हे निश्चित मानले जात असून केवळ औपचारिकता उरली आहे.
सर्वाना पितृपक्ष
संपण्याची प्रतीक्षा..
च्23 सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपल्यानंतरच उमेदवारांच्या नावांसह महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा होईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ सरचिटणीसाने सांगितले.
च्उमेदवारांची निवड करताना घमासान होण्याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे.
च्बडय़ा नेत्यांच्या मुला-मुलींना किंवा वारसदारांना तिकीट देण्याची राजकीय अपरिहार्यता पाहता पक्ष कार्यकत्र्याचा
रोष उफाळून येणो हेही नेहमीचे चित्र आहे.