शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती"; 'अशी' वाढली महागाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:16 IST

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अमृतमोत्सवाच्या जल्लोषात मग्न असणाऱ्या भाजपा सरकारने देशात महागाई नाही, असे सभागृहात सांगितलेल्यांना महागाई कशी दिसेल? कारण त्यांनी डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असून देशाची संपत्ती 'फ्री फंडा'मध्ये 'मित्रांना' विकत आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच 2019 पासून देशात किती टक्के महागाई वाढली याची आकडेवारीच दिली आहे. 

मुलांनाही सोडत नाही

ग्राहकोपयोगी वस्तू गगनाला भिडत आहेत. तांदूळ, दही, पनीर यांसारख्या वस्तू, पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे. सरकार मुलांनाही सोडत नाही.- मनीष तिवारी, काँग्रेस नेते

सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले. सरकारच्यावतीने उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, सध्या जगभरात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान हे, पहायला हवे. जगाने कोरोना आजाराचा सामना यापूर्वी कधीही केला नव्हता. महामारीतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत आहे. त्यामुळेच अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम राहिली आहे.

सरकारने महागाई कमी करण्यासाठी आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. महामारी, दुसरी लाट, ओमायक्रॉन, रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने महागाई दर ७ टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळवल्याचे सीतारमण यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई