शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: “मोदानी मॉडल, आधी लुटा अन् मग कोणत्याही शिक्षेशिवाय सुटा”; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:15 IST

Rahul Gandhi: विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मित्रांची मात्र सुटका केली जाते, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Rahul Gandhi:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. संसदेत बोलू दिले जात नसल्याप्रकरणीही राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता मेहुल चोक्सीला इंटरपोल यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदानी मॉडेल असल्याचा खोचक टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलच्या वाँटेड यादीतून वगळण्यात आले असून, जगात कुठेही आता ते फिरू शकतात, अशा आशयाच्या बातमीचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला आहे. यावरून विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, मित्रांची सुटका केली जाते. हे मोदानी मॉडेल असून, याचा अर्थ आधी लुटा आणि त्यानंतर कोणतीही शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रकरणातून मुक्त व्हा, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.   

मेहुल चोक्सीची रेड कॉर्नर नोटीस रद्द 

इंटरपोलने मेहुल चोक्सी विरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचवर्षी चोक्सीने अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहुल चोक्सीने या रेड कॉर्नर नोटिसीला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला होता. मेहुल चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. सुनावणीनंतर या समितीने रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, नीरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रांसाठीच काम करतात. देशातील १४० कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुल गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार