शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "मास्क लावा, कोरोना येतोय... हा भारत जोडो यात्रा रोखण्यासाठीचा बहाणा"; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:49 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र लिहून राहुल गांधींना भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. हरियाणातील नूह येथे राहुल गांधी म्हणाले की, त्यांची यात्रा रोखण्यासाठी कट रचला जात आहे. यामुळे भाजपाचे लोक घाबरले आहेत. यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते की, भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाची भीती दाखवली जात आहे.

नूह येथे भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे. मला पत्र लिहिले की, कोरोना येत आहे, यात्रा थांबवा. आता भाऊ, तुम्ही बघा, भारत जोडो यात्रा थांबवण्याचे बहाणे दिले जात आहेत. कोरोना पसरत आहे, प्रवास थांबवा मास्क घाला. हे सर्व बहाणे आहेत. हे लोक भारताच्या शक्तीला आणि सत्याला घाबरतात."

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "तुम्ही बघा, मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. आता यात्रेमध्ये आपण 100 हून अधिक दिवस चाललो आहोत. यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत." राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 21 डिसेंबर रोजी मेवातमधील नूहमार्गे हरियाणात दाखल झाली होती. हरियाणातील यात्रा दोन टप्प्यात आहे. 23 डिसेंबरला ही यात्रा फरिदाबादमार्गे दिल्लीला पोहोचेल. 24 डिसेंबरला ही यात्रा दिल्लीत दाखल होणार आहे. आणि हरियाणात भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे.

कोविड संसर्गावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहून यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. यात्रेचे प्रांतीय समन्वय समितीचे अध्यक्ष सलमान खुर्शीद यांनी यात्रा थांबवली जाणार नसल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत खुर्शीद म्हणाले, "काँग्रेस आपल्या यात्रेमध्ये सर्वप्रथम कोरोनापासून बचावासाठीच्या सर्व खबरदारीचे पालन केले जाईल पण यात्रा थांबणार नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या