शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"मुझे क्या बोलना है?", शेतकरी रॅलीआधीचा राहुल गांधींचा 'तो' Video भाजपाने केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 14:29 IST

BJP Amit Malviya And Congress Rahul Gandhi : भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. 

नवी दिल्ली - भाजपा नेते अमित मालवीय (BJP Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा (Congress Rahul Gandhi) एक व्हिडीओ शेअर करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राहुल गांधीकाँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला नेमकं काय बोलायचं आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. 

"जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्यामध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं" असा सणसणीत टोला देखील अमित मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. राहुल गांधी दोन दिवसीय दौऱ्यासाठी तेलंगणा येथे आले आहेत. त्यावेळी ते एका खोलीत काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बसले होते. राज्यातील शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाआधीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये राहुल इतर कार्यकर्त्यांना मला नेमकं काय बोलायचं आहे हे विचारत आहेत. 

17 सेकंदाच्या या व्हि़डीओ क्लीपमध्ये राहुल गांधी हे खुर्चीवर बसले असून इतरांना आजचा मुख्य विषय काय आहे, मला नेमकं काय बोलायचं आहे ते विचारत आहेत. यावरूनच भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंवर राजकारण करत आहेत, असा  आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंदर्भात बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेला ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्ही चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे. भारत सरकारने याबाबत डब्ल्यूएचओकडे आक्षेपही नोंदवला आहे. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीवरून संपूर्ण जगात भारतासंदर्भात भ्रामक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. पात्रा म्हणाले, राहुल गांधी सातत्याने भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत वारंवार भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू आणि जन्मासंदर्भातील आंकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी भारताकडे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण