शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Congress Protest: राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:19 IST

Congress Mashaal March: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत मशाल मार्च काढला.

Congress Protest March:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यावरुन काँग्रेसने सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी (28 मार्च) लाल किल्ल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मार्च काढण्याची घोषणा केली. याशिवाय बुधवारी देशभरात पत्रकार परिषदा होणार आहेत. त्यानंतर 29 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत स्थानिक पातळीवर 'जय भारत सत्याग्रह' केला जाणार आहे.

सायंकाळी उशिरा काँग्रेसने ‘लोकतंत्र बचाव मशाल शांती मार्च’ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. निषेध मोर्चा सुरू होण्यापूर्वी जेपी अग्रवाल यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना लाल किल्ल्याजवळ ताब्यात घेण्यात आले. मशाल मार्चला परवानगी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लाल किल्ल्यासमोर गोंधळ यानंतर लाल किल्ल्यासमोर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पांढरे कपडे जाळले. त्यानंतर पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेली काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये बसवले. ताब्यात घेतलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना नवीन पोलीस लाईनमध्ये नेण्यात येत आहे.

दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी सुनावलेहुकूमशहा 'सत्य' आणि 'सत्याग्रह'ला घाबरतो, असे काँग्रेसने यावेळी म्हटले. काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोक आवाज उठवू शकत नाहीत, शांतता मोर्चा काढू शकत नाहीत. पोलीसही त्यांचेच आहेत. आम्हाला राजघाटावर जाऊ दिले जात नाही, संसदेत बोलू दिले जात नाही. विरोधकांनी जायचे कुठे ?

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाdelhiदिल्ली