शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Congress Protest: काँग्रेस खासदारांसोबत गैरवर्तन, मारहाणही झाली; राहुल गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 13:08 IST

Congress Protest: दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली: महागाई, जीएसटीवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राजधानी दिल्लीतही काँग्रेसचे अनेक नेते निदर्शने करत आहेत. यादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह राहुल महागाईविरोधात राष्ट्रपती भवनाकडे कूच करत होते. राहुलशिवाय शशी थरूर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक काँग्रेस नेते सध्या विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे.'काँग्रेस खासदारांना मारहाण'राजपथजवळ आंदोलन करत असलेले राहुल गांधी म्हणाले, 'आमच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमच्या खासदारांसोबत गैरवर्तन केले, त्यांना ओढले. काहींना यावेळी पोलिसांनी मारहाणदेखील केली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही." सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राष्ट्रपती भवनापर्यंत कूच करत आहेत, तर पंतप्रधान भवनाचा घेराव करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त आहे.प्रियंका गांधी वढेरा काँग्रेस मुख्यालयात दुसरीकडे प्रियंकाही काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन थरांमध्ये पोलिस तैनात केले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.' त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. 

फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगीदिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा