शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा आज ‘भारत बंद’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:34 AM

देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवार दिनांक १0 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

नवी दिल्ली : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवार दिनांक १0 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या २१ राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. डिझेल, पेट्रोल आणि घसरता रुपया या तिघांमध्ये सर्वात आधी शंभरी गाठण्याची जणू चढाओढ सुरू आहे. आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा या ‘बंद’च्या माध्यमातून प्रयत्न असेल.प्रस्तावित ‘बंद’ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन म्हणाले, देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे.‘बंद’ची कारणमीमांसा देताना माकन म्हणाले, चार वर्षांत पेट्रोलवर २११.७ टक्के व डिझेलवर ४४३ टक्के एक्साईज ड्युटी वाढली आहे. मे २0१४ मधे पेट्रोलवर ९.२ रूपये व डिझेलवर ३.४६ रूपये एक्साईज कर होता आता तो अनुक्रमे १९.४८ रूपये व १५.३३ रूपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. सरकारने गेल्या चार वर्षात इंधनावरील एक्साईज ड्युटीव्दारे ११ लाख कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इंधन भडक्याने वाढत चाललेली तमाम वस्तूंची महागाई रोखण्यासाठी पेट्रोल व डिझेलला त्वरित ‘जीएसटी’च्या कक्षेत आणावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.जनतेला उत्तर हवे आहे....डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या सुरू असलेल्या घसरणीचा उल्लेख करीत माकन म्हणाले, युपीएच्या काळात डॉलरच्या तुलनेत रूपया ६0 वर पोहोचला तेव्हा नरेंद्र मोदी म्हणायचे की, रूपया अति दक्षता विभागात दाखल झाला आहे आता रूपयाने ७२ ची सीमा पार केली तेव्हा पंतप्रधान मोदींना काय म्हणायचे आहे? डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत करण्यासाठी सरकारने काय केले, त्याचे उत्तरही जनतेला हवे आहे.राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते राज्यातील विविध आंदोलनात सहभागी होतील. शांततामय मार्गा$ने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.>इंधन आणखी महागलेमुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा लीटरमागे अनुक्रमे १२ व १० पैसे वाढ झाली. मागील १७ दिवसातच पेट्रोल २.७९ व डिझेल ३.५५ रुपये प्रति लीटर कडाडले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलसाठी ८८ रुपयांहून अधिक तर डिझेलसाठी ७७ रुपये मोजावे लागत आहेत.राजस्थानने घटविला व्हॅटजयपूर : पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर कमी करण्यासाठी राजस्थान सरकारने चार टक्क्यांनी व्हॅट घटविला. यामुळे इंधन लीटरमागे अडीच रुपये स्वस्त होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस