शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 11:18 IST

Coronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी

ठळक मुद्देदेशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या१ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीदेखील विद्यार्थ्यांच्या बाजूनं पुढे आल्या आहेत. कोरोनासारख्या या कठोर परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा देण्यास सांगितल्यामुळे प्रियंका गांधी यांनी CBSE बोर्डाला फटकारलं असून ते विद्यार्थ्यांविषयी बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे."सध्याच्या परिस्थितीत सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणे हे बेजबाबदारपणाचं आहे. बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा शेड्यूल केल्या पाहिजेत अथवा परीक्षा अशा प्रकारे घ्याव्यात की गर्दी असलेल्या केंद्रांमध्ये मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसेल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला फटकारलं.विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणीसध्या देशभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून मे मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणं किंवा त्या ऑनलाइन पद्धतीनं घेण्याची मागणी केली आहे. परंतु सीबीएसई आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत