शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:36 IST

Priyanka Gandhi News: संसद सुरक्षा त्रुटी, विरोधी खासदारांचे निलंबन आणि मणिपूर हिंसाचारावरून प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली.

Priyanka Gandhi News( Marathi News ): संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष केंद्रावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मणिपूरमधील एका घटनेचा उल्लेख करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात निषेध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही. संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावे, हीच आमची मागणी आहे, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर टीका केली. यानंतर प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमधून भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही

प्रियंका गांधी यांनी मणिपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर नातेवाइक अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. जरा विचार करा की, मणिपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांवर आठ महिन्यांनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूरबाबत संसदेत प्रश्न विचारला असता, सरकारने जबाबदारी घेण्याऐवजी विसंगत उत्तरे दिली. आता खुद्द पंतप्रधान ज्या संसदेत बसतात ती संसदही सुरक्षित राहिलेली नाही, तर सुमारे दीडशे खासदारांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.  भाजपाच्या राजवटीत संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावरुन भाजपावर जोरदार टीका करत कारवाई मागचे कारण सांगितले. संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक्ता होती. सदनचा तो अधिकार होता, आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केले, आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे. पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही. खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केले. खासदारांचे असे निलंबन करणे चुकीचे आहे, अशी टीका शरद पवारांनी केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस