शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 17:18 IST

Congress Priyanka Gandhi And TMC : तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी लखनऊमधील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याच दरम्यान तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. तृणमुल काँग्रेसने (TMC) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. 

"ममता बॅनर्जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने या देशातील राजकारणात महिलांचा वाढता सहभाग निश्चित करण्यासाठी मार्ग दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवणारा आमचा पहिला पक्ष आहे" असं तृणमुल काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं (टीएमसी) अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काँग्रेस गांभीर्यपूर्वक याबद्दल घोषणा करत असेल तर त्यांनी केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात" असं देखील तृणमूलने म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव"

पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला 40 टक्के महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे. 

माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. याची सुरुवात 40 टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात 50 टक्के महिलांना तिकिटे दिली जाईल. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असं प्रियंका म्हणाल्या. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस