शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या 'या' पाच सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 23:11 IST

लघु आणि मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाच सूचनाही दिल्या आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसने हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहेया पत्रात सोनिया गांधींनी नरेंद्र मोदी यांना काही सूचना केल्या आहेतया पत्रात सोनिया गांधी यांनी, पंतप्रधानांकडे एमएसएमई सेक्टरसाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे

नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देश कोरोना बरोबरच आर्थिक संकटालाही सामोरा जात आहे. यापार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाच सूचनाही दिल्या आहेत. काँग्रेसने हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे. 

या पत्रात सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मोदींकडे एमएसएमई सेक्टरसाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. तसेच एसएमई सेक्टरकडे दुर्लक्ष केल्यास एमएसएमईला मोठा फटका बसेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होईल, असेही म्हटले आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते, अमेरिका अन् फ्रान्सलाही टाकले मागे"

सोनिया गांधींनी दिलेल्या सूचना -

  • सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करावी. जेने करून लोकांची नोकरीही वाचेल आणि या सेक्टरचे मनोबलही टिकून राहील.
  • सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 1 लाख कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी फंड तयार करावा. जेनेकरून या सेक्टरकडे पुरेसे पैसेही राहतील. याचा उपयोग त्यांना अत्यंत आवश्यकता असेल तेव्हा करता येईल.
  • सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 24 तास हेल्पलाइन जारी करावी. तसेच आरबीआय आणि इतर कमर्शियल बँकांनी हे निश्चित करायला हवे, की या सेक्टरशी संबंधित लहान व्यापाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळेल. 
  • एमएसएमईअंतर्गत घेतलेल्या कर्जावरील व्याज भरणे 3 महिन्यांसाठी टाळण्यात यावे. तसेच सरकारने या क्षेत्राशी संबंधित टॅक्स माफ करण्यावर अथवा कमी करण्यावर विचार करावा.
  • एमएसएमई सेक्टरला कर्ज भेटण्यास जे अडथळे येतात ते सरकारने दूर करावेत. 

चीनबरोबरचे सर्व आर्थिक संबंध तोडा, युरोप अन् अमेरिकेनंतर 'या' देशांमध्ये होतोय कडाडून विरोध

 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानcorona virusकोरोना वायरस बातम्या