जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग२

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे आता बाहेरचा रस्ता धरू लागले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले जि.प.चे माजी सदस्य राजकुमार घुले यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे कुठलीही पावले उचलली जात नाहीत, असा आरोपही असंतुष्टांनी केला आहे.

Congress president resigns - Part 2 | जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग२

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग२

सरीकडे काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे आता बाहेरचा रस्ता धरू लागले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले जि.प.चे माजी सदस्य राजकुमार घुले यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे कुठलीही पावले उचलली जात नाहीत, असा आरोपही असंतुष्टांनी केला आहे.

चौकट...
प्रदेशाध्यक्षांना साकडे
वासनिकांनाही भेटणार
- तब्बल तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सलग पराभव झाल्यानंतरही सुनीता गावंडे या जिल्हाध्यक्ष पदावर कायम आहेत. आता त्यांच्याजागी दुसऱ्या सक्षम व्यक्तीला संधी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन केल्याची माहिती आहे. संबंधित शिष्टमंडळ लवकरच माजी मंत्री मुकुल वासनिक यांचीही भेट घेणार आहे. विशेष म्हणजे वासनिक यांच्या विश्वासातील काही नेते मंडळींनीही या मोहिमेला छुपा पाठिंबा देत असल्यामुळे या मोहिमेकडे काँग्रेसमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress president resigns - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.