शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 14:06 IST

गांधी आडनावावरुन राहुल गांधींवर लंडनमध्ये प्रश्नांची सरबत्ती

लंडन: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. दोन दिवस जर्मनीला थांबल्यानंतर आता राहुल गांधीलंडनमध्ये आहेत. राहुल गांधी सध्या परदेशातील भारतीयांशी संवाद साधत आहेत. परदेशांमधील व्यासपीठांवरुनही राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. मात्र याठिकाणीही राहुल गांधी यांना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांसाठी लंडनमध्ये असलेल्या राहुल यांना 'तुमच्याकडे गांधी या आडनावाशिवाय आणखी काय आहे?,' असा प्रश्न विचारण्यात आला. 'आडनावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काय आहे? तुम्ही आयुष्यात काय साध्य केलं आहे?', अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधींवर करण्यात आली. यावर माझी बाजू ऐकल्याशिवाय माझ्याबद्दल निष्कर्ष काढू नका, असं उत्तर राहुल यांनी दिलं. 'शेवटी निवड तुम्ही करायची आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन टीका करायची की माझ्या क्षमतेच्या आधारे माझी योग्यता ठरवायची, हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे,' असं राहुल म्हणाले. माझ्या वडिलांनंतर कुटुंबातील कोणाकडेही सत्तेतील पद नव्हतं, याकडे राहुल गांधी यांनी पत्रकारांचं लक्ष वेधलं. 'माझे वडील पंतप्रधान होते. मात्र त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे पंतप्रधानपद किंवा मंत्रीपद नव्हतं, याचा अनेकांना विसर पडला आहे,' असं राहुल यांनी म्हटलं. 'मी जे बोलतो, ते तुम्ही ऐका. विविध मुद्यांवर माझ्याशी संवाद साधा. परराष्ट्र निती, आर्थिक धोरणं, भारतीय विकास, कृषी या विषयावर माझे विचार करा. माझ्याशी चर्चा करा. आधी माझ्याशी बोला आणि मग निष्कर्ष काढा,' असं आवाहनही त्यांनी केलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLondonलंडनRajiv Gandhiराजीव गांधी