शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आता सर्वसामान्य कार्यकर्ताही घेणार राहुल गांधींची भेट, जाणून घ्या कसे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:15 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडयातून एकदिवस कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याची पक्षाची जुनी परंपरा पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देराहुल सकाळी सव्वानऊच्या सुमारास अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात आले व त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि कर्नाटकातून आलेल्या पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली.राहुल गांधींचे कार्यालय आठवडयातून एकदिवस 9.30 ते 11 या वेळेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खुले असेल. 

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडयातून एकदिवस कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याची पक्षाची जुनी परंपरा पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींनी बुधवारी नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात देशभरातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. राहुल गांधींचे कार्यालय आठवडयातून एकदिवस 9.30 ते 11 या वेळेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खुले असेल. 

पक्ष कार्यकर्त्यांना वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेता येईल. या चर्चेच्यावेळी तिथे प्रसारमाध्यमांना प्रवेश मिळणार नाही असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. राहुल सकाळी सव्वानऊच्या सुमारास अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात आले व त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि कर्नाटकातून आलेल्या पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. कर्नाटकमध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 

राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी त्यांच्या कार्यकाळात 10 जनपथ निवासस्थानी फक्त महत्वाच्या बैठकांना मार्गदर्शन करायच्या.  राहुल यांना ही व्यवस्था मोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे.  

राहुल गांधींसाठी प्रॉक्सी प्रचार

पुढच्यावर्षी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसने त्यादृष्टीने प्रचार सुरु केला आहे. यावर्षी विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांच्याभोवती प्रचार केंद्रीत होईल असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी जनमताची चाचपणी सुरु केली आहे. पुढच्या वर्षी राहुल गांधी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याबद्दल कुठलीही शंका नाही. पण लोक याबद्दल काय विचार करतात. त्यांना उत्साह वाटतो का ? हे समजून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या चाचपणीमधून लोकांना राहुल गांधींमध्ये नेमके काय हवे आहे त्याची कल्पना येईल आणि निवडणूक रणनिती आखण्यामध्ये मदत होईल असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस