शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी लालू प्रसादांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:19 IST

राहुल गांधींनी एम्समध्ये लालू प्रसाद यांची भेट घेतली 

नवी दिल्ली: चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एम्समध्ये जाऊन लालू प्रसाद यांची भेट घेतलीय. यावेळी राहुल यांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जातेय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राहुल गांधींना राष्ट्रीय जनता दलाकडून पाठिंबा मिळताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी एम्समध्ये वडिलांची भेट घेतली होती. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटवर दिली होती. 'दिल्ली एम्समध्ये काही क्षण वडिलांना भेटलो. त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटते. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. वय वाढल्यानं त्यांची काळजी घेण्याची गरज आहे,' असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'लालू प्रसाद यादव यांच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही आमच्यासाठी आणि बिहारसाठी सुदैवाची बाब आहे. लालू प्रसाद लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो,' असं तेजस्वी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.चारा घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव सध्या एम्समध्ये उपचार घेत आहेत. याआधी ते रांचीमधील तुरुंगात होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रांचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आलं. लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव 12 मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. मात्र या लग्न सोहळ्याला लालू प्रसाद उपस्थित राहणार की नाही, याबद्दलची निश्चित माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवcongressकाँग्रेस