शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या शपथविधीला राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 20:19 IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना काँग्रेसमध्ये चिंतेची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना काँग्रेसमध्ये चिंतेची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी होत आहे. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. उद्या संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी संपन्न होईल.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर हल्लाबोल केला होता. याशिवाय राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणत मोदींना वारंवार लक्ष्य केलं. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाददेखील राष्ट्रपती भवन येथे संपन्न होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित असतील.लोकसभा निवडणुकीत भाजपानं दणदणीत यश मिळवत 303 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला अवघ्या 52 जागांवर यश मिळवलं. पश्चिम बंगालमध्ये भाजपानं ममता बॅनर्जींना मोठा धक्का दिला. बंगालमधील 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवत भाजपानं तृणमूलच्या गडाला खिंडार पाडलं. यानंतर मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं बॅनर्जींनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपण सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हणत यू टर्न घेतला. 

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी